Ratnagiri : प्रकाश शिगवण यांचा स्वगृही पक्षप्रवेश

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत
Ratnagiri News
प्रकाश शिगवण यांचा स्वगृही पक्षप्रवेश
Published on
Updated on

मंडणगड : लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले भाजपचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी कोलाड येथे झालेल्या कार्यक्रमात स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश केला.

8 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, अजय बिरवटकर, भाई पोस्टुरे, मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, स. तु. कदम, महेश केकाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधना बोथरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी, संदीप राजपूरे, तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, हरेष मर्चंडे, सतीष दिवेकर, प्रकाश भुवड, पराग करमरकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रकाश शिगवण, यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे मंडणगड तालुका अध्यक्ष सुभाष सापटे, उपाध्यक्ष फौरोज, उक्ये, अरुण घोसाळकर, हसरत खोपटकर, दिनेश साखरे, सुभाष शिगवण, माजी सरपंच शुभांगी शिगवण, शंकर खेराडे, गणेश सावर्डेकर, पुंडलीक सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्वगृही प्रवेश केला. या वेळी स्वागत समारभांत खासदार सुनील तटकरे म्हणाले की, मुळ पक्षाच्या विचारधारेशी कोणतीही फारकत न घेता गेल्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news