Ratnagiri News : आंबा घाटातून फक्त अवजड वाहतूक बंद

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील जमीन खचल्याने रस्त्याला भेगा
Amba Ghat
आंबा घाटातून फक्त अवजड वाहतूक बंदFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात जमीन खचल्याने रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सध्या घाटातून फक्त अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून चारचाकी वाहने आणि एसटी बसेसची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने लवकरच रस्त्याची पाहणी करून एसटी वाहतुकीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.काही दिवसांपूर्वी घाटातील दोन दर्‍यांना जोडणाऱ्या भागात रस्त्याला भेगा पडल्या होत्या. आमदार किरण भैया सामंत यांनी घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि पोलिस अधीक्षकांनीही पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news