

रत्नागिरी : एस.टी. बसेसमध्ये मुंबई, पुणे यासह दूरचा प्रवास करण्यासाठी पूर्वी ऑफलाईन पध्दतीने बुकींग करण्यात होत होती. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता एस. टी. विभागाने आता ऑनलाईन तिकीट बुकिंगची सोय करण्यात आली आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या ऑनलाईन सेवेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ऑफलाईनबरोबरच आता ऑनलाईन तिकिटातूनही एस.टी. विभाग मालामाल होत असून त्यातून लाखोंचे उत्पन्न विभागास मिळत आहे.
एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट बूक करता यावे ऑनलाईन तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले. 1 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन सेवा सुरू झाली. या ऑनलाईन सेवेद्वारे मोबाईलवर ही तिकीट काढण्याची सोय करण्यात आली आहे.
रत्नागिरीकरांनी आता ऑनलाईन तिकीट काढून लांबचा प्रवास करीत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यासह राज्यभरात लाखोंची उलाढाल या ऑनलाईल तिकीट बुकींग होत असल्याचे सांगण्यात आले मात्र शहरातील महत्वाच्या ठिकाणापासून लांबल्या पल्ल्याच्या गाड्याचे आरक्षण करताना राज्य पहिवन महामंडळाच्या अॅपमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे त्याचीही दुरूस्ती करण्याची मागणी ही प्रवाशांनी केली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, सोलापूर यासह लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये जाण्यासाठी जागा मिळावी म्हणून ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू करण्यात आले. त्यातही ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचे आगाऊ आरक्षण मिळत असल्याचे सांगण्यात आले.
एसटी प्रवाशांनी एनपब्लिक. एसएसआरटीसीओआरएस.कॉम या अधिकृत संकेतस्थळावरून एमएसआरटीसी बस रिझरव्हेशन मोबाईल अॅपचा वापर करावा. तसेच तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या क्रमांकावर संपर्क साधावा, अडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत. ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरूनदेखील तिकीट न मिळाल्यास पेमेंट गेट वे संदर्भात या तक्रारींसाठी 0120-4456456 हा क्रमांक महामंडळाने प्रवाशांसाठी दिला आहे. या वापर करण्याचे आवाहन केले आहे.
एस.टी. विभागाची ऑनलाईन सेवा सुरू झाल्यामुळे चांगले झाले आहे. लांबचा प्रवास करायचा असेल तर अॅपवर जाऊन आधीच तिकीट आरक्षण करत आहोत. रत्नागिरी-सोलापूर, अक्कलकोट-लांजा असा प्रवास सुरू असतो.
इब्राहीम शेख, प्रवासी