Chandrashekhar Bawankule : राज्‍यात नवा लँड टायटलिंग कायदा आणणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; रत्नागिरीत महाराजस्व अभियान समाधान शिबिर
Chandrashekhar Bawankule
रत्‍नागिरी : महाराजस्‍व अभियान समाधान शिबिरात बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जि. प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आ. किरण सामंत, आ. प्रसाद लाड, आ. प्रमोद जठार, आ. विक्रांत पाटील, आ. शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे.
Published on
Updated on

रत्‍नागिरी : जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ असा नवीन ‌‘लँड टायटलिंग कायदा‌’ आणणार आहे. तसेच, कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘देवस्थान जमीन इनाम कायदा’ लवकरच आणला जाईल, अशी मोठी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली.

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात ते बोलत होते. महसूलमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात महसूल अभियानांतर्गत अडीच लाख लोकांना विविध प्रकारचे दाखले मिळवून दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी चिपळूण परिसरात नव्याने एखादे तहसील कार्यालय व्हावे, अशी मागणी केली.

या सर्व मागण्या महसूलमंत्र्यांनी मान्य केल्या. कार्यक्रमास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डाॅ. उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रशांत यादव, सतीश मोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जिंदल यांनी प्रास्ताविक केले. विविध विभागांच्या लाभार्थ्यांना यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news