Nairobi Marathi Sahitya Sammelan : केनियातील नैरोबीत रंगणार हृदयंगम मराठी साहित्‍य संमेलन

१ मेपासून वैचारिक परिसंवाद, कविसंमेलन व सांस्‍कृतिक कार्यक्रम
 Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya SammelanFile Photo
Published on
Updated on

रत्‍नागिरी : मराठी मातीचा सुगंध आता सातासमुद्रापार पूर्व आफ्रिकेतील केनियामध्ये दरवळणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), विभव इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र मंडळ, नैरोबी यांच्या संयुक्त विद्यमाने १ आणि २ मे रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

'कोमसाप'च्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन म्हणजे जागतिक स्तरावर मराठी संस्कृतीचे बीजारोपण आहे, अशा शब्दांत केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नैरोबीतील 'महाराष्ट्र मंडळाने' या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली असून, परदेशातील मराठी बांधवांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे.​

​नामवंत साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील ६० हून अधिक मान्यवर साहित्यिकांचा जत्था नैरोबीला रवाना होत आहे. यात प्रामुख्याने कवी अशोक नायगावकर, कवी अरुण म्हात्रे, विचारवंत पांढरपट्टे, संगीतकार कौशल इनामदार, लेखक अभिजित जोशी यांसारख्या दिग्गज कलावंतांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अधिकारी, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्थ अनुप कर्णिक आणि 'कोमसाप'चे पदाधिकारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.​

​'कोमसाप'चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र, नमिता कीर यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल, असा विश्वास त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केला आहे.​

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news