खेड : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसह दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मटका जुगार अड्डे बंद असल्याचा दिखावा केला जात असल्याचा सूर नागरिकांकडून आळवला जात आहे. मटण-मच्छी मार्केट परिसर मटका जुगाराचा अड्डा बनला आहे.
या ठिकाणी असलेल्या एका सुसज्ज इमारतीच्या तळमजल्यानजीक राजरोसपणे मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहरात मोक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या या अड्ड्यांसह गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवरही धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. पोलिस निरीक्षक भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांकडून कारवाई आहे. जात कारवाईनंतरही मटका जुगार पुन्हा सुरू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधानसभा आचारसंहितेसह निवडणूक तसेच सुरु असलेल्या दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणचे मटके जुगार अड्डे बंद आहेत. मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीने या व्यवसायाला ऊत आला आहे. मटण-मच्छी मार्केट लगत असलेल्या एका सुसज्ज इमारतीतील गाळ्यांमध्ये मटका जुगार अड्डा सुरू असल्याची बाब समोर आली आहे.