

Ratnagiri, Raigad Maharashtra Navnirman Sena crisis
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकणातील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते वैभव खेडेकर (खेड), अविनाश सौंदळकर (राजापूर), संतोष नलावडे (चिपळूण) आणि सुबोध जाधव (माणगाव) यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंन केल्या प्रकरणी आणि पक्षविरोधी कार्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर कोकणातील मनसेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडींमुळे नवे वळण येण्याची चिन्हे दिसत असून, कोकणात मनसेचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.