Ratnagiri : अल्पसंख्याक महिला ‘मायक्रो फायनान्स’च्या जाळ्यात
आरवली : मायक्रो फायनान्स कंपन्याच्या जाळ्यात अल्पसंख्यांक समाजातील महिला अडकल्या असून त्यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन धावून आले आहेत. या पीडित महिलांच्या वतीने जाकीर शेकासन यांनी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक आयोग, मुंबईकडे तक्रार दाखल करून अर्जदार महिलांनी निर्णय होईपर्यंत कर्ज वसुलीस स्थगिती मिळावी, अशी मागणी केली. अल्पसंख्याक आयोग राज्य सदस्य वसीम बुर्हाण यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांना महिलांना त्रास देऊ नका, असे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक आयोगाला वैधानिक दर्जा असून दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.
साक्षरता नसलेत्या महिलांना कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. ग्रामीण कुट, समस्ता, संकष्टी, उन्नती फायनसर्व, आदि अशा फायनान्स संस्थांनी एका वेळी दोन वर्ष मुदतीचे पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज देत पहिले कर्ज फेड झाले नसताना दुसरे, तिसरे कर्ज बेकायदेशीर दिले असे प्रकार झाले आहेत. आधीचे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देत महिलांना फसवून त्यांना कर्जाच्या पाशात अडकवले गेले आहे, असा आरोप जाकीर शेकासन यांनी केला आहे.
महिलांच्या वतीने दिलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेले व्याज रक्कम दर यापेक्षा अधिक दराने फायनान्स कंपन्या व्याज आकारत आहेत, कर्ज वसुली करणारे एजंट, प्रतिनिधी दादागिरी, दमदाटी दहशत करुन कर्जदार महिलांकडून कर्जाच्या नावाखाली भरमसाट रक्कम वसुली करीत आहेत, रिझर्व बँक आफ इंडियाचे सर्व कायदे, नियम डावलून कर्जाच्या नावाखाली सावकारी व्यवसाय करण्यात येत आहे, पुरेसे ज्ञान नसताना केवळ मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपत्या आर्थिक फायदासाठी आम्हाला फसवून दिशाभुल करून तसेच कोणतीही कल्पना न देता आमच्या अशिक्षितपणाचा व साधेपणाचा गैर फायदा घेत जबरदस्तीने कर्ज देऊन आमची अर्जदाराची फसवणूक केली आहे, मायक्रो फायनान्स कंपन्या अल्पसंख्यक, मुस्लिम, बौद्ध समाजातील महिलांना लक्ष्य करून त्रास व मानसिक छळ करीत असल्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे अनेक मुद्दे नमूद करून आयोगाचे लक्ष वेधले आहे. तसेच अंतिम चौकशी व निर्णय होईपर्यंत मायक्रो फायनान्स कंपन्यांना वस्ली स्थगित करण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक आयोगाचे राज्य सदस्य वसीम बुर्हाण यांनी महिलांनी केलेली तक्रारीची दाखल गांभीर्यांनी घेतली आहे. तसेच त्रास देणार्या मायक्रो फायनान्स संस्थांनावर कारवाई करण्यात येईल, असे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांना आश्वासित केले आहे.

