खेड शहर : महाराष्ट्रातील शाळांना मारक असणार्या नवीन संच मान्यतेचे निकष बदलण्याकरिता शासन दरबारी सर्वतोपरी सहकार्य करणार असून मुख्याध्यापक महामंडळाच्या बरोबरीने मुख्याध्यापकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या 63 व्या अधिवेशनानिमित्त ते बोलत होते.
यावेळी ना. सामंत पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासमोर कोणते प्रश्न उभे आहेत, याची जाणीव मला आहे. टप्पा अनुदानावर असणार्या शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असून पुढील टप्पा वाढ नियमितपणे कशी होईल, याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुनी पेन्शन योजना देण्यासाठीदेखील सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून आलेले बहुसंख्य मुख्याध्यापक पाहता मी कायमच मुख्याध्यापक महामंडळाच्या सोबत असल्याचा आनंद आपल्याला होत आहे. मात्र आपणही असेच बहुसंख्येने पाठीशी असल्याचे पोस्टल मतदानाने दाखवून द्यावे असे मिश्किल पणे त्यांनी सांगितले.
यावेळी महामंडळ माजी अध्यक्ष अरुण थोरात पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी चेअर पर्सन म्हणून मार्गदर्शन केले डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि मुख्याध्यापक यांची भूमिका या विषयावर व्याख्यानाच्या माध्यमातून विचार प्रकट केले याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मंत्री योगेश कदम शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे महामंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, जे. के. पाटील सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष डॉ. डी एस घुगरे आर. व्ही. पाटील, गोपाल पाटील, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर वामन तर्फे, मुख्याध्यापक महामंडळाचे कोशाध्यक्ष संदेश राऊत, सहसंपादक रमेश तरवडेकर, सुनील भोर, संजय कुमार झांबरे, राज्य प्रवक्ता प्रसाद गायकवाड, मुकेश पाटील, डॉ बी बी पाटील, संजय पाटील, माजी सचिव आदिनाथ थोरात, शांताराम पोखरकर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, खजिनदार सुनील देशमाने, अनंत साठे, राजश्री नारे, अनंत साळवी, रामचंद्र कापसे, श्रीशैल्य पुजारी, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष हजारे, सचिव सुनील देसाई, प्रशांत खेडेकर, मंगेश गोरिवले, संजय वाघमारे ,शंकर गलांडे, संदेश कांबळे, महावीर कुसनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.