Mercedes Benz Fire | मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर मर्सिडीज बेंझला भीषण आग: ३ जण बचावले

Khed Car Fire | खेड तालुक्यातील नातुनगर येथील घटना
Mumbai Goa highway Car Fire
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नातुनगर गावानजीक पेटलेली मर्सिडिज मोटार(Pudhari Photo)
Published on
Updated on

Mumbai Goa highway Car Fire

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.१३) पहाटेच्या सुमारास नातुनगर (ता. खेड) येथे एका मर्सिडीज बेंझ गाडीला अचानक लागलेली आग खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून विझवली. या दुर्घटनेत तीन जण बचावले असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे सुमारे दुर्घटना घडली. मर्सिडिज कंपनीची मोटार (एम एच ०२ बी झेड १४००) ही संदेश राजेश चवळे यांच्या मालकीची गाडी नाशिकवरून निघून गुगल मॅपद्वारे महाड-नातुनगर मार्गे गणपतीपुळे येथे जात होती. या गाडीत एकूण तीन प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्परतेने गाडीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला.

Mumbai Goa highway Car Fire
Ratnagiri Airport Project | रत्नागिरी विमानतळ सहा महिन्यांत पूर्णत्वास : मंत्री उदय सामंत

आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार आणि प्रणय रसाळ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत केवळ गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news