Uday Samant : मंडणगड न्यायालय इमारत 10 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना
Uday Samant
पालकमंत्री उदय सामंत
Published on
Updated on

मंडणगड : देशाचे सरन्यायाधीश व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह न्याय व्यव्यस्थेच्या उपस्थितीत मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने 10 सप्टेंबरपूर्वी तीन मजली इमारतीचे काम पूर्ण करून इमारत ताब्यात द्यावी, अशा सूचना जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामकाजाचा व न्यायालयाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणी कामाचा आढावा घेतला. यासाठी मंडणगड नगर पंचायतीत अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता जे. ई. सुखदेवे, दापोलीचे प्रातांधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, नगराध्यक्षा अ‍ॅड. सोनल बेर्डे, तहीसीलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, मंडणगड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद लोखंडे, अ‍ॅड. सचिन बेर्डे, शिवसेना जिल्हा प्रमख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णा कदम, उपअभियंता महेश वास्ते, शाखा अभियंता माधव कोंडविलकर, ठेकेदार संदीप पाटील व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सात महिन्यांच्या विक्रमी वेळेत 65 हजार चौरस मिटरची सुशोभीत इमारत उभी केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना संबंधित विभागाचे अभिनंदन केले. न्यायालयाचा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक असल्याने इमारतीबरोबर उद्घाटन सोहळ्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व पूर्वतयारीचा त्यांनी यावेळी विस्ताराने आढावा घेतला. याचबरोबर कार्यक्रमासाठी येणार्‍या मान्यवरांच्या निवासाची विशेष व्यवस्था लावण्याची सूचना उपस्थित अधिकार्‍यांनी दिल्या. इमारतीचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी करावयाच्या आवश्यक उपययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

आढावा बैठकीत ना. सामंत यांनी मंडणगड नगर पंचायतीच्या इमारत सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधीची घोषणा केली. इमारतीचे सुशोभीकरण व इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. रस्ते विकास व सांडपाणी व्यवस्थापन यांच्याकरिता 1 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा केली. याचबरोबर अण्णा भाऊ साठे महामंडळातून 50 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. आंबडवे येथील मॉडेल कॉलेज व आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतीक दर्जाचे स्मारकांचे निर्मितीचे कामासंदर्भातील प्रगती व विविध समस्यांचा आढावा घेऊन विविध सूचना यावेळी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news