Ratnagiri News : मालगुंड विद्यालयाची शोभायात्रा ठरली लक्षवेधी

प्रजासत्ताक दिनी विविधतेतून दिला एकतेचा संदेश; राजमाता जिजाऊ-शिवबा जिवंत देखावा
Ratnagiri News
मालगुंड विद्यालयाची शोभायात्रा ठरली लक्षवेधी
Published on
Updated on

जाकादेवी : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मालगुंड ग्रामपंचायत ते प्रशाला अशी भव्य शोभायात्रा काढून मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.

मुख्याध्यापक बिपीन परकर व पर्यवेक्षक उमेश केळकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही शोभायात्रा वेगवेगळ्या देखाव्यांसह साकार झाली. यावर्षी या शोभा यात्रेची थीम विविधतेतून एकतेचा जल्लोष ही होती. यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रशालेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले.

या शोभायात्रेमध्ये कोळी, आदिवासी, धनगर, वारकरी, शेतकरी, गुजराती, बंगाली, दक्षिण भारतीय, लेझीम पथक तसेच साहित्य कवायत करणारे विद्यार्थी अशा विविधप्रकारच्या वेशभूषेतील विद्यार्थी गीतांच्या बोलावर ठेका धरून थिरकत होते आणि विविधतेतून एकतेचा संदेश देत होते. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ बाळ शिवबाला स्वराज्याचे धडे देताना अशा आशयाचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची कैद आणि कांतारा चित्रपटातील वेशभूषेतील विद्यार्थी विशेष आकर्षणाचा विषय ठरले. सुमारे अडीच तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या शोभायात्रेने मालगुंड परिसरातील ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या शोभायात्रेत मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक विलास राणे, सल्लागार मंडळ सदस्य नंदकुमार डिंगणकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news