काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा
Maharashtra Bhavan will soon be built in Kashmir
काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र भवन बांधणार असल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली.File Photo Pudhari News

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्याद़ृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, जम्मू -काश्मीर सरकारने बडगाम जिल्ह्यामधील इच्चगाम तालुक्यातील 2.50 एकर जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. महाराष्ट्र सदन उभारणीसाठी जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्या वतीने पूर्ण झाली असल्याची माहिती देखील ना. चव्हाण यांनी दिली.

Maharashtra Bhavan will soon be built in Kashmir
Maharashtra Budget 2024 | जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय

महाराष्ट्र सदन उभारण्याच्याद़ृष्टीने दोन्ही राज्यांत आवश्यक प्रक्रिया करण्याच्या द़ृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कश्या स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ना. रवींद्र चव्हाण म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

काश्मीरमधाील बडगाम येथे महाराष्ट्र सरकारच्यावतीने बांधण्यात येणार्‍या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या 2.50 एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

Maharashtra Bhavan will soon be built in Kashmir
श्रीनगरला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news