

दीपक कुवळेकर
रत्नागिरी : भ्रष्ट राजकारण्यांमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. उद्ध्वस्त झालेली काही माणसे नंतर सूड घेण्याचा प्रयत्न करतात. निवृत्ती झालेल्या तीन स्वातंत्र्यसैनिकांना या भ्रष्ट राजकारणाचा फटका बसतो आणि दोघे हिंसक मार्गाने, तर एकजण अहिंसेच्या मार्गाला वळतो आणि शेवट या भ्रष्ट राजकारणाचा बदला घेतला जातो. अशी कथा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या नाटकातून मांडली गेली. ही कथा रसिकांना चांगलीच भावली.
स्वा. सावरकर नाट्यगृहात सोमवारपासून 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यर्स्पेला सुरुवात झाली. बुधवारी कै. संभाजीराव महादेवराव भोसले माजी सैनिक फाऊंडेशन संचलित ऐशप्रिया आर्ट अकॅडमी पोफळी यांनी इंडियाज मोस्ट वॉन्टेड ही कलाकृती सादर केली. लेखक संजय बेलोसे यांनी उत्कृष्टपणे त्याची मांडणी केली आहे. तर हे नाटक मंगेश डोंगरे यांनी दिग्दर्शित केले आहे.
भ्रष्ट राजकारणातून अन्याय झालेले तीन माजी सैनिक एका घरात रहात असतात. त्यापैकी आचार्य समाजकार्यात स्वतःला वाहून घेतात. ते शांती, अहिंसेचे ते पाईक असतात. केसरी हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक, तर सिंग-हरिचाचा कमांडर असतो. तिघेही भ्रष्ट राजकिय नेता अशोक चक्रवर्तीचे बळी ठरतात. राजकारणात केसरीना मनोरुग्ण ठरविले जाते तर सिंग हरिचाचाचा मुलगा आणि पत्नी चक्रवर्तीने अपहरण केलेले असते. वैज्ञानिक-केसरी यांना रस्त्यावर फिरत असताना आणतात. तर सिंग-हरिचाच्याला भूमिगत राहण्यासाठी आचार्य घराच्या तळघरात ठेवून घेतात. सोबत आदीवासी मुलगी भारती हिला आचार्य तिला शिकवून डॉक्टर करतात. तळघरात वैज्ञानिक केसरी बॉम्ब बनविण्यासारखे अनेक प्रयोग करत असतो. सिंग-हरिचाचा आणि केसरी यांना अशोक चक्रवर्तीला संपवायचे असते. पण आचार्य अहिंसेच्या मार्गाने जाणार असतात. त्यामुळे या दोघांचं काहीच चालत नाही. निवडणुकीच्या कालावधीत बॉम्ब स्फोट होतो. त्यावेळी अतिरेकी वेशात एक मुलगा म्हणजेच बाबू झेंडे आचार्यांच्या मानेला पिस्तुल लावून आचार्यांच्या घरी-तळघऱात घेऊन येतो. तो जखमी असतो. त्यांच्यावर भारती उपचार करते. तो व्यवस्थित होतो. निवडणुकीत घडलेल्या बॉम्ब स्फोटाचं खापर आचार्यावर येते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. या कालवधीत तंदुरस्त झालेला बाबू झेंडे -भारतीचा विनयभंग करण्यास सरसावतो. तिघेही तिला सोडवतात. भारतीने तुला वाचवलं, ती माते समान आहे. तिच्यावरच अत्याचार करतोस या अशा आचार्यांच्या वणीने बाबू झेंडेवर परिणाम होते. त्याला तळघरातून बाहेर हाकलतात. दोन दिवसांनंतर बाबू झेंडे पुन्हा मद्यधुंद अवस्थेत तळघरात येतो. तिघांनाही मला मारुन टाका असे सांगतो. आपला जीवन प्रवास सांगतो.
आचार्य पुन्हा त्याला ठेवून घेतात. चौघेही राजकीय नेता अशोक चक्रवर्तीला मारण्याचा प्लान चौघेही करतात. त्यावेळी केसरीनी माणूस बेशुद्ध होईल असे पिस्तुल त्याच्याकडे देतात. त्यामध्ये झेंडे बेशुद्ध होतो. त्याला केसरी पुन्हा शुद्धीवर आणतात. यावेळी आचार्यांची सुटका करण्यासाठी झेंडे तळघरात फोन नसतानाही केसरी नी तयार केलेल्या फोन वरुन बॉम्ब स्फोट घडविणाऱ्यांना धमकी देतो. बॉम्ब स्फोट प्रकरणातून आचार्याची सुटका होते. तसेच हरिचाचाच्या मुलगा व पत्नीला सुखरुप बाहेर काढतो. मात्र अशोक चक्रवर्ती विरुद्ध हरिचाचांनी तयार केलेली फाईल आपल्या ताब्यात घेतो. बाबू झेंडे शांती व अहिंसेचा पाईक होतो. आचार्य-मास्तर यांच्याप्रमाणेच समाज सेवा करण्याचे व्रत घेतो निघून जातो. या कालवधीत कार बॉम्ब स्फोटात नेता अशोक चक्रवर्ती व चालक बाबू झेंडे यांचा मृत्यू होता. तळघरात शांतता पसरते. पेपरमध्ये मृत्यू झालेल्या बाबू झेंडेचा फोटो नसतो. त्यामुळे केसरी, आचार्य आणि भारती हायसे वाटते. तेवढ्यातच बाबू झेंड म्हणजेच आधार अशोक चक्रवर्ती आचार्याच्या वेशात समोर दाखल होतो. शेवटी आधार चक्रवर्ती वडिलांच्या जागी निवडणूक लढवतो. जाताना आचार्यांकडे त्यांची गांधी टोपी मागतो अशी कथा आहे.
केशरीची भूमिका मंगेश डोंगरे, बाबू झेंडे - विक्रांत जिरंगे, मास्तर - राजेंद्र जाधव, सिंग हरिचाचा - साताप्पा राणे, तर भारतीची भूमिका अर्चना यादव यांनी सादर केली. या नाटकाला संगीत नीलेश मुळ्ये, प्रकाश योजना - उदय पोटे, रंगभूषा व वेशभूषा - दीपेश घाणेकर, नेपथ्य - उदय भोसले, दिलीप जाधव, विनोद कदम, संजय सुतार तर रंगमंच व्यवस्था प्रमोद बोडरे, संजय गोळपकर, रामा भगत - सुनील विचारे, संतोष डांगरे, विनायक सुतार यांनी काम पाहिले.