Chiplun News | चिपळुणात ग्रामपंचायतींची होतेय लूट

एकाच ठेकेदाराकडून साहित्य खरेदी करण्याची सक्ती; अन्यथा कारवाईचा बडगा
Gram Panchayat chiplun
एकाच ठेकेदाराकडून साहित्य खरेदी करण्याची सक्तीPudhari File Photo
Published on
Updated on

चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. मात्र, या प्रशासकीय कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. चिपळूण पंचायत समितीमध्ये असाच प्रकार सुरू झाला असून, सध्या मर्जीतील एकाच ठेकेदाराकडून सर्व ग्रामपचायतींना साहित्य पुरवठा केला जात आहे. त्यातून ३५ टक्क्यांची सेटलमेंट झाल्याची चर्चा चिपळूण पंचायत समितीमध्ये सुरू आहे. यामुळे तालुक्यातील सरपंच संतापले आहेत.

शासनामार्फत ग्रामीण विकासासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून ग्रा.पं.ना विविध साहित्य खरेदी करावे लागते. पण एकाच ठेकेदाराकडून जेम (GEM) पोर्टलवरून ग्रामपंचायतींनी वस्तू खरेदी करण्याचा धाक दाखविण्यात आला आहे. जर संबंधित ठेकेदाराकडून या वस्तू घेतल्या नाहीत तर ग्रामपंचायतींची चौकशी लावतो, दप्तर तपासणी करतो, असा बडगा चिपळुणात उगारला जात आहे. त्यामुळे काही ग्रामसेवक तसेच सरपंच देखील मेटाकुटीला आले आहेत.

चिपळूण पं. स.त ठेकेदाराचा तळ

तालुक्यात १३० ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींची माहिती त्याने पंचायत समितीमधून एका अधिकाऱ्याला हाताशी धरून मिळविली आहे. सुरुवातीला हा एकच ठेकेदार आला. मात्र, आता पाच ते सहाजण आले असून त्यांनी पंचायत समितीच्या एका खोलीत अधिकाऱ्यांप्रमाणे तळच ठोकला आहे. त्यामुळे एकप्रकारे चिपळूणमध्ये संयुक्तपणे लूट केली जात आहे.

शासनाने विविध विकासकामे करताना आणि वस्तू खरेदी करण्यासाठी जेम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन वस्तू खरेदी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, संबंधित ठेकेदार ४० टक्के बाढीव दराने या वस्तू ग्रामपंचायतींना खरेदी करावयास लावत आहे. अव्वाच्या सव्वा दर लावून चिपळुणात दर्जाहीन वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. चाळीस टक्के वाढीव दराने घेतलेली रक्कम ३५ टक्के कमिशन वाटण्यात जात आहे. अनेक ग्रामपंचायतींनी याला विरोध केला. परंतु चिपळूण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचा बडगा उगारल्याने अनेकांचा नाईलाज झाला आहे. काही ग्रामपंचायतींनी मागणी करूनही त्यांच्या हक्काचे जेमचे आयडी व पासवर्ड मिळालेले नाहीत. पंचायत समितीकडून ते अडविले जात आहेत. या ठेकेदाराने सर्व पंचायत समितीचा डाटाच उपलब्ध केला आहे. आपल्याकडे शासकीय योजनेतून विविध योजनांतर्गत बचत गटांना साहित्य पुरविणे, ग्रामपंचायतींना खेळणी, आरोग्य विभाग अंतर्गत येणारे साहित्य, डस्टबिन्स, कुंड्या, बाके व अन्य साहित्य खरेदी करावे लागते. त्यासाठी हे जेम पोर्टल आहे. मात्र, येथील एका अधिकाऱ्याने ३५ टक्क्यांच्या कमिशनसाठी मर्जीतील एक ठेकेदार चिपळुणात आणला आहे व त्याने आणखी पाच-सहा जणांचे टोळक्ने चिपळुणात आणले असून त्या माध्यमातून ग्रामपंचायतींची लूट होत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील या विरोधात उठाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बाबत सरपंच संघटनेसहीत सर्व १३० ग्रामपंचायती आवाज उठविणार आहेत. लवकरच या संदर्भात आ. शेखर निकम, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, खा. नारायण राणे तसेच आ. भास्कर जाधव आणि विरोधी पक्षातील नित्यांची भेट घेणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news