लांजा : तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्यामार्फत शनिवारी रात्रीपासून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी २० वाहनांवर कारवाई करण्यात आली.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुकीत अवैध दारू वाहतूक व अवैध रोकड बाळगणे, यासह अन्य अवैध बाबींवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. निवडणूक कालावधीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लांजा पोलीस ठाणे आहे.
सतर्क होऊन शहरात व शहर प्रवेश असणारी ठिकाणी वाहनाची कडक तपासणी करत आहेत. लांजा पोलीस ताण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे हे स्वतः नाकाबंदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन व्यहनाची तपासणी करत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा सहरातील कोले तिठा, साटबली रोड, आडगाव रोड- गणपती मंदिर, कुये गणपती मंदिर या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू झाली.