Ratnagiri News : युवा महोत्सवात लांजा महाविद्यालयाची चमक

वक्तृत्व, कथाकथन, क्ले मॉडेलिंगसह विविध स्पर्धांत यश; पाध्ये, कदम, मसने प्रथम
 Ratnagiri News
युवा महोत्सवात लांजा महाविद्यालयाची चमक
Published on
Updated on

लांजा : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. दक्षिण रत्नागिरी विभागातील १४ महाविद्यालयांच्या सहभागाने झालेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट सादरीकरण केले. महाविद्यालयाच्या अथर्व पाध्ये याने वक्तृत्व स्पर्धेत, सोनाली कदम हिने कथाकथन स्पर्धेत तर विशाल मसने याने क्ले मॉडेलिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ‘मुकुट’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. सानिया यादव हिला हिंदी वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

तसेच विशाल मसने याने ऑन-द-स्पॉट पेंटिंग, कार्टूनिंग आणि क्ले मॉडेलिंगसह ललित कला विभागातील तीन स्पर्धांमध्ये यश मिळवत विशेष छाप पाडली. ऐशिका ठकराल हिला कोलाज स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. महोत्सवाचे उद्घाटन न्यू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सुनील कुरुप होते. यावेळी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभागाचे समन्वयक नीलेश सावे, सचिव महेश सप्रे, प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विक्रांत बेर्डे, प्रा. डॉ. राहुल मराठे, प्रा. डॉ. राजेंद्र शेवडे, प्रा. प्रदीप कदम, पूर्वा गव्हाणकर, प्रा. विशाखा पावसकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना समितीचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news