दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प

खेड मधील दिवाण खवटी नजिक कोसळली दरड
Konkan Railway stopped due to landslide collapsed
खेड मधील दिवाण खवटी नजिक दरड कोसळली Pudhari File Photo

खेड : गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान नातुवाडी येथे बोगद्या जवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास खेड येथून तातडीने पोकलेन मशीन घटनास्थळी नेण्यात आले आहे. यंत्रांच्या साहाय्याने डेब्रीस बाजूला करण्याचे काम सुरु असून सर्वसाधारणपणे ३ तास काम पूर्ण होण्यास लागतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.

Konkan Railway stopped due to landslide collapsed
नांदेड : पुरातून थर्माकोलच्या हुडीवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात

नातुनगर मोहल्ला येथे घराला नदीचा वेढा

खेड: तालुक्यातील नातुनगर मोहल्ला येथे आज नदी पूर येऊन महसूल जोगविलकर यांच्या घराला पुराचा वेढा पडला आहे. घरात पाणी शिरू लागल्याने जोगविलकर कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ग्रामस्थांनी दोरीच्या साह्याने त्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे.

Konkan Railway stopped due to landslide collapsed
गोंदिया : पुराच्या पाण्यात तरुण दुचाकीसह गेला वाहून

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news