konkan railway recruitment : भरती कोकण रेल्वेची, मुलाखती विशाखापट्टणममध्ये

कोकणातील बेरोजगार तरुणांवर अन्याय, परप्रांतियांना कोकण रेल्वेत घुसवण्याचा डाव
Konkan Railway Jobs
Konkan Railway JobsPudhari
Published on
Updated on

चिपळूण: कोकण रेल्वेच्या १३२ जागांसाठी कोकण रेल्वेने दिनांक.१४ मे रोजी भरतीचे परिपत्रक जाहीर केले आहे. कोकण रेल्वेसाठी ही भरती असताना मुलाखती येत्या ८ जून पासून आंध्रप्रदेश विशाखापट्टणम मध्ये ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील बेरोजगार आणि भूमिपुत्रांवर अन्याय होणार आहे याबाबत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी आवाज उठवला आहे .

ही भरती कोकण रेल्वे मार्फत व त्याचा मुलाखती महाराष्ट्राच्या बाहेर आंध्रप्रदेश विशाखापट्टणम येथे घेण्यात येणार असल्यामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी विरोध केला असून संताप वक्त केला आहे.

मुकादम पुढे म्हणाले की कोकण रेल्वेची भरती परराज्यांमध्ये घेऊन परप्रांतियांना कोकण रेल्वेमध्ये घुसवण्याचा हा डाव आहे कोकण रेल्वे भरतीच्या मुलाखती महाराष्ट्राच्या बाहेर घेण्याचा संबंध येतो कुठे? असा सवाल मुकादम यांनी केला आहे.

कोकण रेल्वेच्या होणाऱ्या भरतीच्या मुलाखती मुंबई, बेलापूर, मडगाव, रत्नागिरी याप्रकारे पूर्वीप्रमाणे याच सेंटरला घेण्यात याव्यात अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती तर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या बाहेर ऑफलाईन मुलाखती घेऊन एक वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने परराज्यातील लोकांना घ्यायचे व त्या बेरोजगारांना कोकण रेल्वे मध्ये कायम करायचे हा वरिष्ठांचा डाव आहे. तो डाव आम्ही हाणून पाडू व परप्रांतीयांची भरती कोकण रेल्वे मध्ये होऊन देणार नाही असेही मुकादम यांनी जाहीर केले आहे.

१३२ पदासाठी परराज्यात मुलाखती

कोकण रेल्वे मध्ये १३२ जागांसाठी ही भरती होत आहे. या मध्ये जूनियर टेक्निकल असिस्टंट ११, क्वालिटी इन्स्पेक्टर १५, वेल्डर १६, फिटर २२, ऑपरेटर १६, ड्रायव्हर ४, ऑफिस बॉय किंवा हेल्पर ३२ अशा जागांसाठी ही भरती होत आहे. मात्र त्यासाठी ऑफलाइन मुलाखती आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे कोकणातील बेरोजगार उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होतील की नाही ही शंका आहे परिणामी या भरती प्रक्रियेत कोकणी बेरोजगार तरुण वंचित राहणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news