Konkan Ganeshotsav : कोकणवासीयांना लागले गणेशोत्सवाचे वेध

चाकरमान्यांची गावाकडे ओढ वाढली; बाजारपेठा सजावट साहित्यांनी फुलल्‍या!
Konkan Ganeshotsav
देवरूख : रंगीबेरंगी सजावट फुलांच्या तोरणांनी सजलेली देवरूख बाजारपेठेतील दुकाने.
Published on
Updated on

साडवली : कोकणातील सर्वात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे वेध आता कोकणवासीयांना लागले आहेत. गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, शहरासह ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची गावाकडे ओढ वाढू लागल्याने बाजारपेठांतही लगबग वाढली आहे.

गणेशमूर्तीच्या आगमनापासून ते घरगुती सजावटीपर्यंत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. गणेशोत्सवातील सजावटीसाठी आवश्यक असलेली रंगीबेरंगी फुले, आकर्षक तोरणे, विविध प्रकारची लायटिंग, कापडी पडदे, साउंड सिस्टीम तसेच अन्य सजावटीचे साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनीही आकर्षक पद्धतीने सजावट साहित्याची मांडणी केली असून, बाजारपेठ रंगीबेरंगी साहित्यांनी सजली आहे. यामुळे देवरुख बाजारपेठेत गणेशोत्सवाची चाहूल अधिक जाणवू लागली आहे.

कोकणातील गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा, घराघरातील सजावट, आरास आणि गणरायाच्या भक्तीत सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांमध्ये वास्तव्यास असलेले चाकरमानी आपल्या गावाकडे परतीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत देवरुख बाजारपेठेत खरेदीसाठी आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गणरायाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news