Ratnagiri News : प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी किरण लोहार यांची नियुक्‍ती

सीईओ वैदेही रानडे यांनी काढले आदेश
Ratnagiri News
प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी किरण लोहार यांची नियुक्‍ती
Published on
Updated on

रत्‍नागिरी : जिल्‍हा परिषदेच्‍या प्रभारी शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते या सेवानिवृत्त झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या जागी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्‍त कार्यभार किरण लोहार यांच्‍याकडे देण्यात आला आहे. तसे आदेश जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी मंगळवारी काढले आहेत. अद्याप रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेला पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळालेला नसून प्रभारीपदावर कामकाज सुरू आहे.

रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेचे कामकाज वर्षभर झाले प्रभारीपदावरच सुरू आहे. मागील जून महिन्‍यात तत्‍कालीन शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांची बदली झाल्‍यानंतर हे महतत्त्‍वाचे पद सहा महिने रिक्‍त झाले होते. जानेवारी महिन्‍यात सिंधुदुर्गच्‍या निलिमा नाईक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार स्‍वीकारला. चार महिन्‍यांनंतर नाईक या सेवानिवृत्त झाल्‍या. त्‍यानंतर सुनीता शिरभाते यांची नियुक्‍ती करण्यात आली.

दोन महिन्‍यानंतर शिरभाते या सेवानिवृत्त झाल्‍या. त्‍यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारीपद रिक्‍त झाले होते. या पदासाठी उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी योजनाचे किरण लोहार या दोघांची नावे चर्चेत होती. अखेर चर्चेला पूर्णविराम मिळाला असून जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्‍त कार्यभार किरण लोहार यांना पुढील आदेश येईपर्यंत देण्यात आला आहे. लोहार यांनी आपल्‍या मूळपदाचे कामकाज पाहून अतिरिक्‍त कार्यभार म्‍हणून पहावयाचा, असे परिपत्रक सीईओ रानडे यांनी काढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news