Ratnagiri Fire Incident : खेडमध्ये वणव्यात बंद वाडा, लाकडे जळून खाक

ब्रह्मकुमारी लाईट हाऊस मार्गावरील लाला कडिया रोड येथील घटना
Ratnagiri Fire Incident
खेड : वणव्यात जळून खाक झालेला गोठा.
Published on: 
Updated on: 

खेड : शहरातील ब्रह्मकुमारी लाईट हाऊस मार्गावरील लाला कडिया रोड येथे शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास वणवा लागल्याची घटना घडली. या आगीत ऋग्वेद संदीप घडशी यांच्या मालकीचा बंद असलेला छोटा वाडा आणि तेथे ठेवलेली लाकडे जळून खाक झाली.

आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीमध्ये संपूर्ण वाडा आणि लाकडे जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी खेड नगरपरिषदेचे फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव आणि सहायक फायरमन प्रणव घाग यांनी विशेष प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.