

खेड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील भेलसई, महाडीकवाडी येथे एका ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
सतिश सदाशिव महाडीक (५०) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. महाडिक हे भेलसई, महाडीकवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे वास्तव्यास होते. ही घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या पूर्वी घडल्याचा अंदाज आहे. याबाबत सतिश महाडीक यांची पत्नी स्मिता महाडीक यांनी खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश महाडिक यांना दारूचे व्यसन होते.
तसेच कोणताही नियमित कामधंदा करत नव्हते. दारूच्या नशेत व नैराश्यातून त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. दाखल सतिश महाडीक यांना उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.