

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनु. जाती व नवबौद्ध घटकांना 100 टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येते. तरी इच्छूक पात्र अर्जदाराने सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, येथे अटींची पूर्तता करणारे पुरावे / कागदपत्रासह संपर्क साधून अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत अनु.जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येते. 4 एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत कमाल रु. 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल रु.8 लाख प्रती एकर.
लाभार्थी निवडीचे निकष : लाभार्थी अनु.जाती व नवबौद्ध घटकातील असावा. लाभार्थी दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन असावा. लाभार्थीचे किमान वय 18 ते 60 वर्षे असावे. निवडीचे प्राधान्यक्रम :- दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन परित्यक्त्या स्त्रिया. दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन विधवा स्त्रिया. अनु.जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनु.जातीचे अत्याचारग्रस्त.