

चिपळूण : शहरानजीकच्या कळंबस्ते येथे राहणार्या 59 वर्षीय व्यक्तीसह अन्य एकाची तुम्हाला नोकरी लावतो असे सांगून तब्बल 13 लाख 24 हजार 800 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शरद विजयकुमार पवार (रा. करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि. 15 मार्च2024 ते 11 जुलै 2024 या कालावधीत कळंबस्ते येथे घडली. त्यानुसार सुभाष भगवान घाडगे (59, रा. कळंबस्ते फाटकाजवळ, मूळ रा. तुळशी, ता. सोलापूर) यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यातील शरद पवार याने नोकरी लावतो, असे सांगून सुभाष घाडगे यांची 9 लाख 4 हजार 800 रुपये व शेषराव येनाजी राठोड यांची 4 लाख 20 हजार अशी एकूण 13 लाख 24 हजार 800 रुपयांची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून फसवणूक केली. यासंदर्भात सुभाष घाडगे यांनी तक्रार दिली आहे.