Ratnagiri News : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा धोका, समुद्रात खेळताना साताऱ्यातील १४ वर्षीय मुलीला त्रास; आंजर्ले आरोग्य केंद्रात उपचार

Ratnagiri News : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा धोका, समुद्रात खेळताना साताऱ्यातील १४ वर्षीय मुलीला त्रास; आंजर्ले आरोग्य केंद्रात उपचार
Published on: 
Updated on: 

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समुद्रात अंघोळीसाठी उतरलेल्या सातारा येथील श्रेया गोरे (वय १४) या मुलीला जेलीफिशचा स्पर्श झाल्याने त्वचेवर खाज आणि जळजळ होण्याचा त्रास झाला. तिला तातडीने आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे दापोली तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आंजर्लेसह विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची रेलचेल वाढली असून, अनेकजण समुद्रात अंघोळीचा आनंद घेत आहेत. मात्र, समुद्रात जेलीफिशचा वावर असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

जेलीफिशच्या संपर्कात आल्यास त्वचेवर तीव्र जळजळ, खाज, पुरळ पसरणे, लालसरपणा आणि वेदना जाणवू शकतात. काही प्रकरणांत हृदयाचे ठोके वाढणे, अतिप्रमाणात घाम येणे, थंडी वाजणे तसेच शरीराचे तापमान वाढणे अशी लक्षणेही दिसू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, पर्यटकांनी समुद्रात जेलीफिश दिसल्यास त्यापासून दूर राहावे. जेलीफिशचा स्पर्श झाल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आंजर्ले येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकेश राठोड आणि डॉ. श्रीराज राऊत यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.