Ratnagiri News : जयगड-सातारा द्रुतगती मार्गाचा निर्णय लवकरच

९८ किलोमीटरच्या हरितक्षेत्र मार्गासाठी सविस्‍तर प्रकल्‍प अहवालाची प्रक्रिया
National Highway
जयगड-सातारा द्रुतगती मार्गाचा निर्णय लवकरच
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : कोकणातील जयगड बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडण्यासाठी प्रस्तावित जयगड–चिपळूण–सातारा हरितक्षेत्र द्रुतगती महामार्गाच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या ९८ किलोमीटरच्या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) व शक्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतचा पुढील निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

जयगड बंदर–चिपळूण–सातारा असा हा प्रस्तावित मार्ग सातारा येथे NH-४८ ला जोडला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नियोजनानुसार कोकणातील बंदरांना पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी पट्ट्याशी जलद जोडणी देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. जयगड बंदरातून होणारी मालवाहतूक सातारा, पुणे तसेच पुढील बाजारपेठांकडे अधिक वेगाने पोहोचविण्यास या मार्गाचा उपयोग होऊ शकतो. या प्रकल्पाचा मार्ग ९८ किलोमीटरचा असून डीपीआर व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराला २७० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. निविदा ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार असून १ ऑक्टोबरला त्या उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष आराखडा, तांत्रिक अभ्यास, पर्यावरणीय बाबी, भूसंपादन आणि बांधकामाच्या पुढील प्रक्रिया निश्चित होतील. त्यामुळे सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजन व DPR च्या टप्प्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news