Ratnagiri News : लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्‍यू; ६ जनावरे जखमी

कुटगिरी गावठाणानजीकची घटना
Bridge Collapse
जनावरे चरताना दिसत आहेत.
Published on
Updated on

गुहागर शहर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणानजीक असलेला लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता कोसळून त्याखाली अडकून एका बैलाचा मृत्यू झाला असून अन्‍य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जि. प. बांधकाम उपअभियंता व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचनादेखील गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या. दरम्यान, या दुर्घटनेत ठार झालेल्‍या बैलासह जखमी ६ जनावरे बाहेर काढण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news