Ratnagiri News : गुलदार युद्धनौका समुद्राच्या तळाशी; निवृत्तीनंतरही देशसेवा

निवती समुद्रात घेतली समाधी, कृत्रिम प्रवाळ निर्माण होणार; पर्यटकांना पर्वणी
Guldar Warship
गुलदार युद्धनौका समुद्राच्या तळाशी; निवृत्तीनंतरही देशसेवा
Published on
Updated on

कुडाळ : ​कोकणच्या अथांग आणि निळ्याशार समुद्रात आता शौर्याचा एक नवा इतिहास विसावला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मोहिमेला अखेर यश आले असून, भारतीय नौदलातून निवृत्त झालेली ऐतिहासिक युद्धनौका सिंधुदुर्ग किनाऱ्यावर निवती रॉक येथे समुद्रात निश्चित स्थळावर यशस्वीरित्या मंगळवारी सांयकाळी ५.१५ ते ५.३० या वेळेत स्थापित करण्यात आली आहे.

खवळलेला समुद्र आणि आव्हानात्मक हवामानाशी तब्बल ३० तास झुंज देत एमटीडीसीच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. या यशस्वी मोहिमेनंतर ​महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कोकण विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने यांनी थेट किनाऱ्यावरूनच या मोहिमेच्या यशाची घोषणा केली. गेल्या दोन दिवसांपासून आमचे प्रयत्न अहोरात्र सुरू होते. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, अखेर सायनस पोलनुसार ही युद्धनौका समुद्रात विसावली आहे, अशी माहिती माने यांनी दिली.

​..अन् निवृत्तीनंतरही 'ती' पर्यटनासाठी सज्ज!

एखाद्या धडाडीच्या सैनिकाप्रमाणे या युद्धनौकेचा इतिहासही तेवढाच रोमहर्षक आहे. या बलाढ्य युद्धनौकेची निर्मिती 'पोलंड' देशात झाली होती, वर्ष १९८५ मध्ये ही नौका भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानंतर तिने श्रीलंका मोहीम आणि अंदमान-निकोबार बेटांच्या संरक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर भंगारात जाण्याऐवजी, या नौकेला पर्यटनाच्या माध्यमातून एक नवे आयुष्य देण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे, असे माने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news