Ratnagiri Rain : ऐन भात कापणीच्या हंगामात पावसाचा तडाखा

शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले
Unseasonal Rain
ऐन भात कापणीच्या हंगामात पावसाचा तडाखा
Published on: 
Updated on: 

दापोली : दापोली तालुक्यात २ नोव्हेंबर रोजी रात्री तसेच पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने वेळेआधीच दडी मारली होती. अनेक दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यानंतर भातपीक तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली होती. काही शेतकऱ्यांचे भात कापून शेतातच होते, तर काही ठिकाणी कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या शेतात पडून होत्या. मात्र, २ नोव्हेंबरच्या रात्री आणि पहाटे अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कापणी केलेले भात भिजले आहे. भात भिजल्यामुळे दाण्यांचा दर्जा घसरण्याची तसेच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

आधी पावसाच्या खंडामुळे आणि आता कापणीच्या ऐनवेळी झालेल्या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.