

रत्नागिरी : अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले असून, दि. 4 ते 7 ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. परतीचा पाऊस वादळी वार्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पडणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असेही आवाहन हवामान खात्याने केले आहे.