Gas Cylinder Black Marketing | राजापुरात गॅस काळाबाजाराचा पर्दाफाश

Gas Cylinder Black Marketing | तालुक्यातील १०९४ ग्राहकांची पुस्तिका जप्त
Gas Cylinder Black Marketing
Gas Cylinder Black Marketing
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या अनधिकृत विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, पुरवठा विभागाने १ एप्रिल रोजी धडक कारवाई करत 'सद्‌गुरू गॅस सेवा' या नावाने सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका (कार्ड) आणि एक कमर्शियल गॅस सिलिंडर जप्त केला असून, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार समोर आला आहे.

Gas Cylinder Black Marketing
Malegaon Municipal Corporation | मालेगाव महापालिका विशेष महासभेत गदारोळ

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात ग्राहकांची गॅस पुस्तिका जमा करून त्यांच्या नावावर सिलिंडर बुकिंग केले जात होते. त्यानंतर हे सिलिंडर चढ्या दराने विकले जात असल्याचा आरोप आहे.

काही ग्राहकांच्या नावावर सिलिंडर उचलूनही त्यांना प्रत्यक्षात गॅस पुरवठा करण्यात आला नव्हता. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींनंतर हा प्रकार उघड झाला. सध्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाचल परिसरात काळाबाजार वाढल्याची चर्चा सुरू होती. याची गंभीर दखल घेत राजापूर पुरवठा विभागाने अचानक तपासणी केली असता, दुकानात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गॅस पुस्तिका आढळून आली.

Gas Cylinder Black Marketing
MAHA TET Results 2026 | टीईटीचा 'जातीय' निकाल? 89 गुण मिळवूनही खुला प्रवर्ग अपात्र, तर 82 वाला पात्र; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

ही सर्व पुस्तिका आणि जप्त केलेला सिलिंडर दुपारी सुमारे १.३० वाजता अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. या प्रकरणाबाबत सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते (रा. रायपाटण, ता. राजापूर) यांच्याशी संपर्क साधला असता, 'आम्ही गेली ४० वर्षे सेवा देत आहोत. ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे ठेवून जातात,' असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांकडून या स्पष्टीकरणाची पडताळणी सुरू आहे.

या कारवाईवेळी राजापूर पुरवठा निरीक्षक नीलेश लाड, मंडळ अधिकारी पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, पुरवठा लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कात्रे आदी उपस्थित होते. या प्रकरणामुळे पाचल परिसरात एकच खळबळ उडाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news