Ratnagiri News : कवितेच्या राजधानीत रंगला साहित्याचा जागर

आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुतांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
Ratnagiri News
आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुतांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
Published on: 
Updated on: 

गणपतीपुळे : कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे आधुनिक कवितेचे जनक असलेल्या कवी केशवसुतांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम स्मारकातील अर्धाकृती पुतळ्याला स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहातील आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी समारंभात कवी केशवसुतांच्या प्रतिमेला कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलीनीखेर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचाहस्ते दीपप्रज्वलन करून कवी केशवसुतांना अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना आबा पाटील व नलिनी खेर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. हनमंत कदम यांनी कवी केशवसुतांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला व शुभदा मुळ्ये यांनी कवी केशवसुतांची स्फूर्ती ही कविता सादर केली. कोमसाप दक्षिण कोकण विभाग युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये यांनी कवी केशवसुतांच्या जीवनावर आधारित 'कवी केशवसुतांची कविता' व 'शब्दक्रांतीचा सूर्य केशवसुत' या दोन संगीतबद्ध केलेल्या स्वरचित कविता ऐकविल्या तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्यातील क्रांतीचा जयजयकार करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दिवाळीच्या ऐन हंगामात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शुभदा मुळ्ये यांनी लाडू, चकल्या तसेच उज्ज्वला बापट यांनी आणलेला गोड शिरा हा फराळ देऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील, कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, युवाशक्ती प्रमुख (दक्षिण कोकण) अरुण मोर्ये, मालगुंड कार्याध्यक्षा शुभदा मुळे, रामानंद लिमये, हनमंत कदम, उज्ज्वला बापट, डॉ. मोरेश्वर मुळे आणि इतर मान्यवर तसेच कर्मचारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.