Ganesh Chaturthi : गुहागरची गणेशमूर्ती सातासमुद्रापार!

परदेशातही भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन
Ganesh Chaturthi
गुहागरची गणेशमूर्ती सातासमुद्रापार!
Published on
Updated on

गुहागर शहर ः महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा केला जातो. कामानिमित्त युरोपमध्ये असलेल्या राज्यातील युवक-युवती सलग तिसर्‍या वर्षी यंदा गणेशोत्सव साजरा करत आहेत. या उत्सवासाठी गुहागरातून गणेशमूर्ती युरोपमध्ये नेण्यात आली आहे. पुढील काही दिवस ही मंडळी आपला कामं सांभाळून दररोज आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम करीत आहेत.

महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे एकत्र येत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे सर्व तरुण मंडळी महाराष्ट्रातील आहेत. गुहागर तालुक्यातील निखिल सुनील रेवाळे या तरुण देखील येथील ‘जग्वार लँड रोवर’ या जगप्रसिद्ध कंपनीत कामाला आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या गुहागरातील गणेशमूर्ती असावी, म्हणून काही दिवसांपूर्वी आपल्या गुहागरमधील घरी आला होता. गुहागर खालचापाट येथील मूर्तिकार मंगेश घोरपडे यांच्याकडून आकर्षक मूर्ती बनवून घेतली. दि. 19 ऑगस्ट रोजी या मूर्तीला चांगले पॅकिंग करून आपल्यासोबत युरोप मध्ये घेऊन गेला आहे. निखिल हा खास गणेशमूर्ती आणण्यासाठी इतक्या दुरहून आपल्या गावी आला होता. गणेश उत्सवात प्रत्येकजण आपले कामं सांभाळून गणेशाची सेवा करणार आहेत. आम्ही त्याठिकाणी गणेशोत्सव साजरा करत असलो, तरी आपल्या गावातील गणेशोत्सवाची जास्त आठवण येतं असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news