AI Lessons school : ‘एआय’सह रोबोटिक धडे देणारी राज्यातील केळशी पहिली जि.प. शाळा

उद्या होणार प्रारंभ; विद्यार्थ्यांना होणार आधुनिक युगाची ओळख
Ratnagiri News
‘एआय’सह रोबोटिक धडे देणारी राज्यातील केळशी पहिली जि.प. शाळा
Published on
Updated on
समीर जाधव

चिपळूण : संगणक युग सुरू आहे. भविष्यात मात्र रोबोटिक्स आणि ए.आय.चे युग येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शालेय विद्यार्थीदेखील रोबोटिक्स आणि एआयचे धडे गिरवू लागले आहेत. दापोली तालुक्यातील जि. प. प्राथमिक केंद्रशाळा केळशी नं. 1 ही जि. प.ची मराठी शाळा आता महाराष्ट्रात प्रथमच एआय आणि रोबोटिक्सचे धडे गिरवणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दि. 24 जुलै रोजी सकाळी 10 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे, तर संपूर्ण राज्यात जि. प.च्या मराठी शाळेत ईआय टिंकर लॅबचे उद्घाटन होणार आहे आणि विद्यार्थ्यांना नव्या युगाची ओळख होणार आहे.

स्काय रोबोटिक्स, पुणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील 15 माध्यमिक शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकविले जात आहे. या शाळांमध्ये ईआय टिंकर लॅब सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन माध्यमिक शाळांनी यामध्ये सहभाग घेतला असून आता कोकणात नव्हे, तर महाराष्ट्रात प्रथमच दापोली तालुक्यातील केळशी येथील जि.प. प्राथमिक केंद्रशाळा नं. 1 या ठिकाणी ईआय टिंकर लॅब विद्यार्थ्यांसाठी खुली होत आहे. या माध्यमातून पहिली ते सातवीचे विद्यार्थी एआय आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेणार आहेत.

गतवर्षीपासून रत्नागिरी जिल्ह्यात स्काय रोबोट़िक्सने हा उपक्रम सुरू केला. पालक शाळा आणि संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी या नव्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यामध्ये आता प्राथमिक शाळेची विद्यार्थीदेखील सहभागी होत आहेत. दापोली येथील गतीमंद विद्यालयातील विद्यार्थीदेखील एआयचे धडे गिरवू लागले आहेत. त्यातून प्रेरणा घेत केळशी नं. 1 शाळेचे मुख्याध्यापक संदीप तळदेवकर व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच एआय आणि रोबोट़िक्स शिकविले जाणार आहे. या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत 115 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी अद्ययावत 10 संगणकांची लॅब तयार झाली आहे व या ठिक़ाणी या क्षेत्रात तज्ज्ञ असणार्‍या गायत्री परांजपे या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला दापोलीचे गटशिक्षण अधिकारी आर. व्ही. सांगडे, आंजर्ले प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी एन. एच. वलेले, केळशीच्या सरपंच सौ. श्रेया मांदविलकर, स्काई रोबोटिक्सचे संचालक अभिजीत सहस्त्रबुद्धे व कृष्णमूर्ती बुक्का तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज आंबेकर, उपाध्यक्ष प्रथमेश सुपेकर, उपसरपंच, सर्व सदस्य, शिक्षक तसेच पालक उपस्थित राहाणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news