Ratnagiri News : रत्नागिरीतून हापूस पेटी वाशी मार्केटमध्ये!

६ डझन आंब्यांची पहिली पेटी विक्रीसाठी रवाना
Ratnagiri News
रत्नागिरीतून हापूस पेटी वाशी मार्केटमध्ये!
Published on: 
Updated on: 

राजापूर : पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानावर मात करत राजापूर तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे येथील आंबा बागायतदार तानाजी तांबे यांनी हापूसचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या बागेतील सहा डझन आंब्यांची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील यंदाच्या हंगामातील ही पहिली हापूस पेटी असून, तिला सुमारे ५१ हजार रुपये दर मिळण्याची अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली आहे. मूळचे बारामती येथील असलेले तांबे गेल्या २९ वर्षांपासून कोकणात वास्तव्यास आहेत. कीटकनाशके आणि कृषी औषध विक्रीचा व्यवसाय करताना त्यांनी चार वर्षांपूर्वी कुवेशी-तुळसुंदे येथे जमीन खरेदी करून आंबा लागवड केली. विशेष काळजीमुळे फळधारणा टिकवण्यात त्यांना यश आले. परिपक्व झालेल्या आंब्यांची तोडणी करून पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये पाठवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.