Ratnagiri News : मसाल्‍यांवर एफडीएचा छापा; ८४ किलो मसाले जप्त

रत्‍नागिरी ग्रामीणसह चार तालुक्‍यात धडाकेबाज कारवाई
Ratnagiri News
मसाल्‍यांवर एफडीएचा छापा; ८४ किलो मसाले जप्त
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत रत्‍नागिरी ग्रामीणसह तीन तालुक्‍यांत विविध ठिकाणी कारवाई करत १ लाख ३७० रुपयांचे एकूण ८४ किलो मसाल्यांचा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने चिपळूण, गुहागर आणि राजापूर परिसरात केलेल्या कारवाईत विविध प्रकारचे मसाले जप्त केले. चिपळूण येथे १९ किलो मिक्स मसाला (२९ हजार ९२० रुपये), गुहागर येथे २५ किलो मिक्स मसाला (३६ हजार २५० रुपये), तर राजापूर येथे ३० किलो कुर्डी मसाला (२८ हजार २०० रुपये) जप्त करण्यात आला. याशिवाय रत्‍नागिरी ग्रामीण येथे चटणी १० किलो मालाची किंमत ६ हजार रुपये असल्याची नोंद आहे.

ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मसाले मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन काम करीत आहे. सुट्या मसाल्‍यांच्‍यात भेसळ होत असल्‍याच्‍या तक्रारीनंतर सुट्या मसाल्‍यांवर निर्बंध आहेत. नियम पाळून विक्री करणे अपेक्षित आहे. मात्र तीन तालुक्‍यांत नियमांचे उल्‍लंघन करून मसाल्‍यांची विक्री होत होती. त्‍यामुळे ८४ किलो मसाल्‍यांचा साठा जप्‍त करण्यात आला आहे.
- ललित गायकवाड, सहाय‍क आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.