

दापोली; पुढारी वृतसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक दापोलीकडे निघालेली शिवशाही आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. रविवारी (दि ७) सकाळी झालेल्या अपघातात या अपघातात तीनजण ठार झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, माणगाव येथे हॉटेल मानस या ठिकाणी ठाणेकडून दापोलीकडे निघालेल्या शिवशाहीचा (क्र. एम एच 09 इ एल 8246) आणि रिक्षाचा अपघात झाला. याृमध्ये रिक्षातील तीन प्रवाशी जागीच ठार असल्याचे वृत्त आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळतात माणगाव पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.त्या नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात शिवशाही गाडीतील प्रवासी देखील जखमी झाले आहेत. या अपघाताचा माणगाव पोलीस ठाणे तपास करीत आहेत.