Ratnagiri : विवाहितेच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करुन अश्लील संभाषण
रत्नागिरी ः विवाहितेच्या नावे बनावट फेसबूक खाते उघडून त्याव्दारे फिर्यादी महिलेच्या नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींना अश्लिल भाषेत चॅटिंग करणार्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रध्दा भालचंद्र ढवळे (वय 32, रा. पाली, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने 23 मार्च ते 5 जून या कालावधीत या विवाहितेच्या नावाचे बनावट फेसबुक खाते उघडले. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या ओरीजनल फेसबुकमधील फिर्यादीच्या नातेवाईकांशी तसेच मित्र-मैत्रिणींशी अश्लिल भाषेत चॅटिंग केले. तसेच फिर्यादीच्या बाबतीत अश्लिल पोस्ट करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 79 महिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

