

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे पावसाळ्यात साथीचे आजार पसरले आहे. साथीच्या आजारांमुळे सिव्हीलची ओपीडी हाऊसफुल्ल झाली असून दररोज रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात ही रुग्णांची गर्दी वाढली आहे.
पावसाला आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. दरम्यान, यंदाच्या वर्षी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. काहीअंशी उघडीप मिळाल्यामुळे जिल्ह्यात साथीचे आजार पसरले असून सिव्हीलबरोबरच खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी वाढली आहे. लहान मुलांमध्ये थंडी, ताप, उलट्या, जुलाबाचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे डासांमुळे पसरणारे आजार वाढत आहेत. सर्दी-खोकला, हगवण, डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळ, कॉलरा, ताप, गोवर, कांजण्या, टायफॉईड हे साथीचे रोग आहेत.
- पाणी उकळून गार केलेले पाणी प्यावे
-फिल्टर केलेले पाणी प्या, सोबत पाण्याची बाटली ठेवा
-बाहेरचे खाणे टाळावे, शरबत, ज्युस बाहेरचे घेऊ नये
-लहान मुलांची नखे काढा,बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा, न वाळलेले कपडे वापरू नका
-आपल्या अवतीभोवती कुंड्यात, जुन्या वस्तूत, घरासमोर पाणी साचणे धोक्याचे, त्यामुळे डास वाढतात व आजार होतात व संसर्गजन्य आजार असेल तर इतरांशी संपर्क कमी करा.