

रत्नागिरी : जीएसटीचे दर कमी केल्यामुळे ऐन दसर्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. साडेतीनपैकी एक मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी हजारो वाहनांची खरेदी केली आहे. यात सर्वाधिक हिरो, होंडा डिलक्स, टीव्हीएस, जुपिटर, तर चारचाकीमध्ये मारुती व ह्युंदाई या चारचाकींची खरेदी केल्याची नोंद रत्नागिरी आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहने खरेदीला यंदा रत्नागिरीकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांची बुकिंग झाली आहे.
दसर्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीकर सोने, चांदीनंतर वाहन खरेदीला दरवर्षी मोठी पसंती देतात. दसर्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असून यादिवशी मोठ्या संख्येने वाहन खरेदी होत असते. 24 पासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिक वाहनांची बुकिंग केली आहे. दसर्याच्या पूर्वसंध्येला आणि दसर्याच्या दिवशी मनोभावे पूजा करून रत्नागिरीकर आपली वाहने घरी नेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी शोरूममध्ये आपल्या आवडीच्या वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. वाहनांची नोंदणी वेळेत व्हावी आणि रत्नागिरीकरांना वाहने वेळेत मिळावीत, याकरिता रत्नागिरी आरटीओ कार्यालयात अधिकारी, कर्मचारीवर्गाने अथक परिश्रम घेतले जात आहे.
वाहनात जीएसटीचे दर कमी केल्यामुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढलेला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात बुकिंग झालेल्या आहेत. यातून कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याचे सांगण्यात आले.
- दुचाकी- होंडा, टीव्हीएस, जुपिटर
- चारचाकी- मारुती, ह्युंदाई
- इलेक्ट्रिक वाहन- दुचाकी, रिक्षा
दसर्याच्या शुभ मुहूर्तावर रत्नागिरीकर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांनी चारचाकी 220 गाड्यांचे बुकिंग केलेले आहे. यात आर्टिका डिझायर, वॅगनर या गाड्यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात मारुतीच्या विविध प्रकारच्या चारचाकी बुक केलेल्या आहेत.
जागृत मोटर्स