जिल्ह्यात दहा उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध

Maharashtra assembly poll|45 जणांचे अर्ज ठरले वैध; आता 4 नोव्हेंबरपर्यंत कितीजण अर्ज माघारी घेतात याकडे लक्ष
Maharashtra assembly election
जिल्ह्यात दहा उमेदवारांचे अर्ज ठरले अवैधpudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये जिल्ह्यातील एकूण 45 नामनिर्देशनपत्र वैध, तर 10 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. 4 नोव्हेंबर रोजी माघारीची अखेरची तारीख असल्याने किती उमेदवार माघार घेणार आणि किती रिंगणात राहणार, हे निश्चित होणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय वैध ठरलेली नामनिर्देशनपत्र पुढीलप्रमाणे असून दापोली विधानसभा मतदारसंघात अबगुल संतोष सोनू- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कदम योगेश रामदास - शिवसेना, कदम संजय वसंत - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), मर्चंडे प्रवीण सहदेव - बहुजन समाज पार्टी, कदम योगेश रामदास - अपक्ष, कदम योगेश विठ्ठल - अपक्ष, कदम संजय सिताराम - अपक्ष, कदम संजय संभाजी - अपक्ष, खाडे सुनिल पांडुरंग - अपक्ष, खांबे ज्ञानदेव रामचंद्र - अपक्ष यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत.

गुहागर विधानसभा मतदार संघात गांधी प्रमोद सिताराम - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जाधव भास्कर भाऊराव -शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना, प्रमोद परशुराम आंब्रे - राष्ट्रीय समाज पक्ष, मडकले संदिप हरी - अपक्ष, मोहन रामचंद्र पवार - अपक्ष, सुनिल सखाराम जाधव - अपक्ष, संतोष लक्ष्मण जैतापकर - अपक्ष, संदेश दयानंद मोहिते - अपक्ष

265- चिपळूण विधानसभा मतदार संघ - प्रशांत बबन यादव - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार, शेखर गोविंदराव निकम -नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, अनघा राजेश कांगणे -अपक्ष, नसिरा अब्दुल रहमान काझी - अपक्ष, प्रशांत भगवान यादव - अपक्ष, महेंद्र जयराम पवार -अपक्ष, शेखर गंगाराम निकम - अपक्ष, सुनील शांताराम खंडागळे - अपक्ष

266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघ - उदय रवींद्र सामंत - शिवसेना, भारत सिताराम पवार - बहुजन समाज पार्टी, सुरेंद्रनाथ यशवंत माने - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), उदय विनायक बने - अपक्ष, कैस नूरमहमद मणसोपकर- अपक्ष, कोमल किशोर तोडणकर -अपक्ष, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील - अपक्ष, दिलीप काशिनाथ यादव - अपक्ष, पंकज प्रताप तोडणकर- अपक्ष.

267- राजापूर विधानसभा मतदार संघ - किरण रविंद्र सामंत - शिवसेना, जाधव संदीप विश्राम - बहुजन समाज पार्टी, राजन प्रभाकर साळवी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अमृत अनंत तांबडे - अपक्ष, अविनाश शांताराम लाड - अपक्ष, राजश्री संजय यादव - अपक्ष, राजेंद्र रविंद्रनाथ साळवी - अपक्ष, संजय आत्माराम यादव - अपक्ष, यशवंत रामचंद्र हर्याण - अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

दापोली विधानसभा मतदारसंघात अनंत पांडुरंग जाधव - राष्ट्रीय समाज पक्ष फॉर्मवर सूचक दहा नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. गुहागर विधानसभा मतदारसंघात विक्रांत भास्कर जाधव - (मुख्य उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने व फक्त एकच सूचक दिल्याने अर्ज अवैध), दीपक केशव शिगवण यांनी शपथ घेतली नाही व विहीत अ‍ॅफिडेवीट दाखल केले नाही म्हणून अवैध ठरला. सुनिल सुधिर काते (अ‍ॅफिडेव्हिट हे स्टँपपेपरवर व नोटरी केलेले नाही म्हणून अवैध ठरले. सादीक मुनीरुद्दीन काझी ( पुरेसे सूचक नाहीत / अनामत रक्कम जमा केली नाही / अ‍ॅफिडव्हिट अपूर्ण म्हणून अवैध ठरला. चिपळूण विधानसभा मतदार संघात संतोष शिंदे - समाजवादी पार्टी , स्वप्ना प्रशांत यादव - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार, अमित रोहिदास पवार - अपक्ष, सुनिल वेतोस्कर - अपक्ष यांचे अर्ज अवैध ठरले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्याने अविनाश शांताराम लाड यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news