Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चिपळूण, रत्नागिरीत

Eknath Shinde
Eknath ShindePudhari News Network
Published on
Updated on

रत्नागिरी/चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, चिपळूण व रत्नागिरी येथे सभा घेणार आहेत. ना. शिंदे यांची सभा ही जिल्हा परिषदेच्या विजयाची नांदीच असेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

चिपळूण येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही सभा रद्द करण्यात आली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर येत असून एकाच दिवशी ते चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ येथे सभा घेणार आहेत.

पहिली सभा सकाळी 11 वाजता चिपळूण येथे होणार आहे. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड या पाच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी ही सभा असणार आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. दुसरी सभा दुपारी 2 वाजता रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ होणार असून रत्नागिरीसह, राजापूर, लांजा व संगमेश्वर तालुक्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा होत आहे. या दोन्ही सभांच्या जय्यत तयारीसाठी शिवसेना-महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news