

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. 27) रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणार्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची ते पाहणी करणार आहेत.
रविवारी सकाळी त्यांचे कसबा येथे आगमन होईल. स्मारक जागेच्या नंतर त्यांचे सावर्डे येथे आगमन होईल. सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या सभागृहात दुपारी 12.30 वाजता ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने आ. शेखर निकम यांनी त्यांच्या दौर्याची जय्यत तयारी केली आहे. सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे आ. शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले.