Ratnagiri News | रत्‍नागिरीत डेंग्यू रुग्ण संख्‍या वाढतेय, सर्वेक्षण करा

जिल्‍हा परिषद स्‍थायी समिती बैठकीत अध्यक्षा अस्‍मिता केंद्रे यांच्‍या आरोग्‍य विभागाला सूचना
Dengue
DengueFile Photo
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी शहरासह ग्रामीण भागात डेंग्यू रूग्णांची संख्या वाढत असून आजअखेर ९५ हून अधिक डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ठिकठिकाणी सर्वेक्षण करा, जनजागृती करा, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या अध्यक्षा अस्‍मिता केंद्रे यांनी दिली.

जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात नुकतीच स्‍थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा साठा होऊ नये, अधिक वेळ पाणीसाठा ठेवू नये यासाठी सर्वेक्षण करून फवारणी करावी, जेणेकरून जंतू नष्ट होतील. नागरिकांनीही अधिकचा पाणीसाठा करू नये यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले.

बांधकाम साईटवर खोदलेल्‍या खड्ड्यात पाणी साचते, विविध ठिकाणी भंगारवाले रस्‍त्‍यावर, ठिकठिकाणी भंगाराचा ढीग फेकत असतात, त्‍यामुळे याठिकाणी पाणी साठून डेंग्यूचे मच्‍छर होण्यास कारणीभूत होते. याबाबत वेळीच उपाययोजना करून डेंग्यूचे प्रमाण कमी करा, अशी सूचना दिली असल्‍याचे केंद्रे यांनी सांगितले. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, समाज कल्‍याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, कृषी सभापती महेश नाटेकर, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, महिला व बालकल्‍याण सभापती मयूरी शिर्के यांच्‍यासह विविध विभागांतील अधिकारी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.