Ratnagiri hunting accident: शिकारीला गेलेल्या एकाचा‌‍ बंदुकीची गोळी लागून मृत्यू, मिसफायरमध्ये एक जखमी; दापोली तालुक्यातील घटना

माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव
Ratnagiri hunting accident: शिकारीला गेलेल्या एकाचा‌‍ बंदुकीची गोळी लागून मृत्यू, मिसफायरमध्ये एक जखमी; दापोली तालुक्यातील घटना
Published on: 
Updated on: 

दापोली : दापोली तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात रात्री शिकारीसाठी गेलेल्या दोघांना गोळ्या लागल्याची गंभीर घटना बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी घडली. या घटनेत खोंडारण खालचीवाडी येथील सचिन शांताराम शिगवण (वय ४२) यांचा मृत्यू झाला असून सुनील पांदे (४६) हे जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांदे हे दोघे शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी बंदुकीचा मिसफायर झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दाभोळ पोलिसांकडून मिळाली. या मिसफायरमध्ये सचिन शिगवण यांच्या पोटात तसेच पोटाच्या खालच्या भागात अंदाजे चार ते पाच छर्रे लागल्याची माहिती आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सुनील पांदे यांच्या मांडीला दोन ते तीन छर्रे लागले असून ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले.

घटनेत वापरण्यात आलेली बंदूक गावठी बनावटीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तपास दाभोळ पोलिस ठाण्‍याचे सहायक पोलिस निरीक्षक हिरेमठ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news