Bhoste Ghat Accident | भोस्ते घाटात कंटेनरला अपघात; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ८ तास ठप्‍प

वाहनांच्‍या लांबलचक रांगा, चालक जखमी
Bhoste Ghat Accident |
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटात उलटलेला कंटेनर.
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात होऊन चालक जखमी झाला. विकास सिंह असे त्याचे नाव आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल आठ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, डीडी-०३ आर- ९९७३ क्रमांकाचा कंटेनर भोस्ते घाटात आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच खेड मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी व अभिषेक डेरवणकर यांनी तत्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचून जखमी चालकाला प्राथमिक मदत उपलब्ध करून दिली. पुढील उपचारासाठी त्याला भरणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यात अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी २ वाजल्यापासून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी महामार्गावरील वाहतूक भोस्ते घाटातील मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेवरून सुरू ठेवण्यात आली. मात्र त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांनी नियमनाचे काम केले. संध्याकाळपर्यंत कंटेनर हटविण्याचे प्रयत्न सुरू होते. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news