Ratnagiri News| कुवारबाव येथे ९६ कोटींचा उड्डाणपूल उभारणीला सुरुवात!

वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न सुटणार
Ratnagiri News
कुवारबाव येथे ९६ कोटींचा उड्डाणपूल उभारणीला सुरुवात!
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील कुवारबाव येथे पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक फाट्यादरम्यान चारपदरी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे ९२५ मीटर लांबीच्या या पुलासाठी ९५ कोटी ९५ लाख ७७ हजार ७७७ रुपये खर्च अपेक्षित असून, जून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी शहरातून हातखंबाकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. मिऱ्या ते नागपूर या चारपदरी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

रत्नागिरी ते आंबा घाट या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून, काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कुवारबाव येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. उड्डाणपुलाचे नियोजन लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा मार्ग भविष्यात सर्व्हिस रोड म्हणून वापरला जाणार आहे.

उदय सामंत, किरण सामंत यांचे प्रयत्न