तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा बँकेच्या भरतीपूर्व परीक्षेत गोंधळ

खेड केंद्रावर उमेदवारांचा संभ्रम: परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले
Confusion in Zilla Bank pre-recruitment exam due to technical issues
तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा बँकेच्या भरतीपूर्व परीक्षेत गोंधळPudhari Photo
Published on
Updated on

खेड : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी भरतीसाठी राबवण्यात येत असलेल्या परीक्षा प्रक्रियेत आज (रविवार) तांत्रिक अडचण आल्याने खेड मधील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. यावेळी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परंतु केंद्र संचालकांनी पोलिसांच्या मदतीने परिस्थिती हाताळली. या केंद्रावरील उमेदवारांच्या परीक्षा पुन्हा घेणार असल्याचे बँकेच्या संचालक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा देण्यासाठी सुमारे नऊशे उमेदवार जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून खेडमध्ये आले होते. परंतु जिल्हा बँकेने परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेल्या यंत्रणेत तांत्रिक अडचण आल्याने उमेदवार परीक्षार्थी यांना ताटकळत रहावे लागले. यावेळी परीक्षा देण्यासाठी आलेल्‍या उमेदवारांमध्ये केंद्र परिसरात गोंधळ उडाला.

खेड येथील घरडा कॉलेजमध्ये सकाळी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांना अखेर दुपारी सांगण्यात आले की, आज परीक्षा होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले की, घरडा कॉलेज हे तांत्रिक कॉलेज असून सुद्धा तेथे इंटरनेटचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे आजची परीक्षा दोन दिवसानंतर घेण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून घरडा कॉलेजमधली इंटरनेट सेवा बंद पडली होती. एका बॅचचे २७० उमेदवार असे सुमारे ९०० उमेदवार परीक्षार्थींची या केंद्रावरची परीक्षा पुढील दोन दिवसानंतर घेण्यात येणार आहे. चिपळूण येथे वेर्णा, आंबव पॉलिटेक्निक कॉलेज, खेड मधील ज्ञानदीप येथे या परीक्षा केंद्रावर या परीक्षा होत आहेत. त्यामुळे ही परीक्षा घरडा कॉलेजमध्ये पुढील दोन दिवसात जाहीर करण्यात येईल, असेही जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news