Chiplun Samruddhi Free Diving Instructor | एका श्वासात 120 फूट खोल समुद्रात!

चिपळूणची समृद्धी बनली भारताची फ्री-डायव्हिंग प्रशिक्षक; इतरांसाठी प्रेरणादायी प्रवास
Chiplun Samruddhi Free Diving Instructor
एका श्वासात 120 फूट खोल समुद्रात!(Pudhari Photo)
Published on
Updated on

समीर जाधव

चिपळूण : महाराष्ट्रातील एकमेव फ्री -डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून हा बहुमान समृद्धी देवळेकर हिला मिळाला आहे. चिपळूणचे उबाठा शिवसेना पक्षाचे माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक राजू देवळेकर यांची ती कन्या आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत शिक्षणाविषयी आवड, प्रशिक्षक आणि आई-वडील यांच्या पाठबळावरच मी हे अत्यंत महत्त्वाचे शिक्षण घेऊ शकले, असे समृद्धी देवळेकर हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चिपळूणची लेक आणि कोकणातील चिपळूणची सुकन्या समृद्धी राजू देवळेकर हिने आपल्या ध्येय, मेहनत आणि निसर्गप्रेमाच्या जोरावर चिपळूणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. समृद्धी आता प्रमाणित झ-ऊख फ्रीडायव्हिंग इन्स्ट्रक्टर बनली असून, अशी मान्यता मिळवणार्‍यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये एक आहे. समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल 120 फूटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि 4 मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते.

Chiplun Samruddhi Free Diving Instructor
Chiplun Crime: चिपळूणच्या निवृत्त शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उकलले, ट्रॅव्हल एजंटने विश्वासाचा गळा घोटला; असा लागला छडा

ही एक अतुलनीय आणि अत्यंत दुर्मिळ क्षमता आहे. समृद्धीचं आयुष्य सुरुवातीला आकाशाशी जोडलेलं होतं. ती एक ट्रेनी पायलट होती. पण पंखांमधून पाण्यात उतरलेली तिची ही जीवनकथा फारच अद्वितीय आहे. समुद्राने तिला बोलावलं आणि एकदा तिचा पाय खोल समुद्रात गेला की तिने मागे वळून पाहिलंच नाही. त्या क्षणापासून तिने आपलं आयुष्य फ्रीडायविंगसाठी समर्पित केलं. नुकतीच ती फिलिपिन्समधून? ? आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रीडायविंग कोर्सेस व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे. तिच्याकडे भारत आणि जगभरातून विद्यार्थी येतात. खोल पाण्याशी एकरूप होण्यासाठी, श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याही पुढे जाण्यासाठी.

समृद्धीचा ठाम विश्वास आहे की, भारतीयांमध्ये फ्रीडायविंगसाठी अपार क्षमता आहे. आपल्याकडे असलेली मानसिक शांतता, योगाभ्यासाची परंपरा, शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सर्व गुणांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो.

Chiplun Samruddhi Free Diving Instructor
Chiplun Karad Road | पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चिपळूण-कराड मार्ग सुरू

फ्रिडायव्हिंग ही निसर्गाशी एकरूप होण्याची साधना

फ्रीडायव्हिंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. ज्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश केला जातो. ही केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मनियंत्रण आणि निसर्गाशी एकरूप होण्याची एक साधना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news